ना. शिवेंद्रराजे भोसले  Pudhari Photo
सातारा

Maharashtra budget 2026: साताऱ्याचाच दबदबा; 358 कोटींचा बूस्टर

ना. शिवेंद्रराजेंच्या पाठपुराव्यामुळे किल्ले अजिंक्यतारा सुशोभीकरण, महाराणी ताराराणी स्मारकासाठी तरतूद

पुढारी वृत्तसेवा

सातारा : ऐतिहासिक सातारा येथील संगम माहुली येथे महाराणी ताराबाई समाधी परिसराचा विकास व सुशोभीकरण करणे आणि अजिंक्यतारा किल्ल्याचे सुशोभीकरण व संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून संगम माहुली येथे महाराणी ताराबाई समाधी परिसराचा विकास व सुशोभीकरणासाठी 133 कोटी रुपये तर, किल्ले अजिंक्यतारा सुशोभीकरण व संवर्धनासाठी 135 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून अन्य तरतुदी धरून साताऱ्याच्या विकासाला सुमारे 358 कोटींचा बूस्टर मिळाला आहे. याबद्दल ना. शिवेंद्रराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

ना. शिवेंद्रराजेंच्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे पर्यटनवाढीच्या दृष्टीने आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धनाच्या दृष्टीने हा महत्वकांक्षी प्रकल्प मंजूर झाला असून यामुळे साताऱ्याच्या सौंदर्यात आणि ऐतिहासिक वैभवात मोठी भर पडणार आहे. हा प्रकल्प मंजूर करून घेतल्याबद्दल जिल्हावासियांमधून समाधान व्यक्त होत आहे.

महाराणी ताराबाई यांचे संगम माहुली येथे स्मारक उभारणे आणि संगम माहुली परिसर सुशोभित व विकसित करणे तसेच किल्ले अजिंक्यताराचे सुशोभिकरण व संवर्धन करणे या कामांना मंजुरी मिळवण्यासाठी ना. शिवेंद्रराजे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. ना. शिवेंद्रराजे यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने या कामाचा परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. ना. शिवेंद्रराजे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या कामांना मंजुरी दिली आहे. त्यांनी त्यांच्या भाषणात याचा उल्लेख करून या कामांना निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.

अजिंक्यतारा किल्ला, महाराणी ताराराणी समाधी व इतर संबंधित वारसा स्थळांचे संवर्धन, सुशोभीकरण व विकास करण्यासाठी एकूण सुमारे 358 कोटींचा विकास प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. यामुळे साताऱ्याच्या विकासाला मोठा बुस्टर मिळणार असून पर्यटनवाढीला मोठी चालना मिळणार आहे.

ना. शिवेंद्रराजेंच्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे पर्यटनवाढीच्या दृष्टीने आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धनाच्या दृष्टीने हा महत्वकांक्षी प्रकल्प मंजूर झाला असून यामुळे साताऱ्याच्या सौंदर्यात आणि ऐतिहासिक वैभवात मोठी भर पडणार आहे. हा प्रकल्प मंजूर करून घेतल्याबद्दल जिल्हावासियांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT