bison 
सातारा

Satara News : म‌’श्वरमध्ये रानगव्याच्या धडकेत तलाठी जखमी

सततच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण; वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर :महाबळेश्वर ते किल्ले प्रतापगड मार्गावरील आंबेनळी घाटात रानगव्याच्या धडकेत कुंभरोशीचे ग्राम महसूल अधिकारी शरद लिंबराज साळुंके जखमी झाले. या अपघातात त्यांना दुखापत झाली आहे.

बुधवारी सकाळी साळुंके हे महाराजस्व अभियानाच्या पूर्व तयारीसाठी वाडा कुंभरोशीकडे दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली. जंगलातून अचानक मुख्य रस्त्यावर आलेल्या रानगव्याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली व पुन्हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या जंगलात पळ काढला. जखमी साळुंके यांना तातडीने महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना वाई येथे हलवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे, वनरक्षक लहू राऊत यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली तसेच रुग्णालयात जाऊन साळुंके यांची भेट घेतली. महाबळेश्वरचे नायब तहसीलदार विनोद सावंत, तलाठी सागर शिंदे व सहकाऱ्यांनीही रुग्णालयात धाव घेतली.

महाबळेश्वर तालुका परिसरात रानगव्यांच्या हल्ल््यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. महाबळेश्वर ते मेढा, महाबळेश्वर ते तापोळा व महाबळेश्वर ते प्रतापगड या मार्गांवर रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर टेकवलीजवळ रानगव्याच्या धडकेत प्रभाकर कासुर्डे यांचा मृत्यू झाला होता. महाबळेश्वर शहर व परिसरातही रानगव्यांचा वावर वाढला असून परिसरात त्यांचा मुक्त संचार आढळतो. यावर वन विभागाने उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT