तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळे, धबधबे, धरणे आणि घाट परिसर दि. ६ ते १० जुलै या कालावधीत बंद करण्याचे आदेश दिले आहे. डोंगराळ आणि दुर्गम भागात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे अचानक दरडी कोसळणे, भूस्खलन होणे, नद्यांना पूर येणे आणि संपर्क यंत्रणा खंडित होणे अशा नैसर्गिक आपत्तींची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशानुसार वाई तालुक्यातील प्रसिद्ध धोम धरण परिसर, मेणवली घाट व कृष्णा नदीकाठ; खंडाळा तालुक्यातील धरणे व डोंगराळ भागातील पर्यटनस्थळे, तर महाबळेश्वर तालुक्यातील आर्थर सीट, केट्स पॉईंट, एलिफंट्स हेड पॉईंट, लिंगमळा धबधबा, विल्सन पॉईंट, सावित्री पॉईंट, ऐतिहासिक प्रतापगड परिसर आणि तापोळा (मिनी महाबळेश्वर) या सर्व प्रमुख पर्यटनस्थळांवर पर्यटकांना जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.