सातारा

Mahabaleshwar Rain: महाबळेश्वरला दोन महिन्यांत १६९ इंच पाऊस; संततधारेने जनजीवन विस्कळीत

वीकेंडला पर्यटकांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरासह परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी रात्रभर आणि शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिल्याने नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. खराब हवामान असूनही वीकेंडच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने महाबळेश्वरमध्ये दाखल झाले असून दोन महिन्यांत १६९ इंच पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन ते चार इंचांची नोंद होत असलेला पाऊस आता सहा ते आठ इंचांपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी ८.३० ते शनिवार दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० या २४ तासांत १८२.२ मिमी (७.१७ इंच) पावसाची नोंद झाली. तर १ जून ते १ ऑगस्टअखेर ४,३०९.८ मिमी (१६९.६७ इंच) इतका विक्रमी पाऊस झाला आहे.

प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे तसेच संबंधित मार्गावरून प्रवास करताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले सततच्या पावसामुळे रस्त्याची स्थिती अत्यंत नाजूक झाली असून कोणतीही निष्काळजीपणा गंभीर अपघातास कारणीभूत ठरू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाने या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती तातडीने करून सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT