सातारा

Mahabaleshwar heavy rainfall: महाबळेश्‍वरमध्‍ये पावसाची दमदार हजेरी

शहर व परिसरात बुधवारी दिवसभर पावसाची धुवांधार बॅटिंग

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वर शहर व परिसरात बुधवारी दिवसभर पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू होती मंगळवारी दिवसभर पावसाच्‍या जोरदार सरी कोसळल्‍या. मंगळवार सकाळी ८.३० ते बुधवारी सकाळी ८.३० अखेर १५७.२ मिमी (६.१८ इंच) पावसाची नोंद झाली. तर ०१ जून ते २४ जून सकाळी ८.३० वाजेपर्यंत ७.९३ इंच पावसाची नोंद झाली आहे.

अर्धा जून महिना उलटला तरी पाऊस न बरसल्यामुळे हवालदिल झालेले महाबळेश्वरवासिय या दमदार पावसाच्या आगमनाने सुखावले आहेत. एकीकडे यंदाच्या उन्हाळी पर्यटन हंगाम जोरदार झाला असून आता पुढील चार महिने पावसाचा सामना करावा लागणार आहे. यासाठीच्‍या तयारीला आता कुठे वेग आला आहे.

घरामध्ये किराणा सामान भरण्यापासून घरांवर इमारतींवर प्लास्टिक आच्छादनाच्‍या कामांना आता जोरदार सुरुवात झाली आहे. घरात ऊब रहावी यासाठी शेगडीसाठीच्‍या कोळशाची मागणी वाढली आहे. तर रंगीबेरंगी छत्र्या, रेनकोट, पावसाळी, चप्पल बूट, क्रॉक्सच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. शेतीच्या कामांना वेग आला असून भागामध्ये भात लावणीसाठीची गडबड सुरु झाली आहे. महाबळेश्वर शहर व परिसरात आता असाच जोरदार पाऊस बरसावा व पुढील काही दिवसात वेण्णा तलाव ओसंडून वहावा, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT