सातारा

Mahabaleshwar Crime: महाबळेश्वरमध्ये विनापरवाना खैर लाकूड वाहतूक; दोघे ताब्यात

महाबळेश्वर शहरातील महाड-पोलादपूर चेकनाका परिसरात वनविभागाने विनापरवाना खैर लाकूड वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरातील महाड-पोलादपूर चेकनाका परिसरात वनविभागाने विनापरवाना खैर लाकूड वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत 61 हजारांचे 3.15 घनमीटर खैर लाकूड व पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे.

वनरक्षक शालिनी कोहळे यांना संशय आल्याने त्यांनी पिकअपला (क्रमांक एमएच-01-एएल-8878) थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहन न थांबवता पुढे नेल्याने कोहळे यांनी तत्काळ पाठलाग करून वाहन पकडले. तपासणीदरम्यान वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात खैर लाकूड आढळून आले.

याप्रकरणी सुनिल ज्ञानदेव मर्ढेकर (वय 45, रा. ओझरे, ता. जावली), विठ्ठल रामचंद्र चव्हाण (वय 47, रा. कामठी, जि. सातारा) व धनाजी संपत पवार (वय 50, रा. वेळे, जि. सातारा) यांच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहा वनसंरक्षक प्रदीप रौंधळ व वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT