सातारा

Eknath Shinde : ना. एकनाथ शिंदे यांची नातवासोबत ट्रॅक्टर सफारी

ऑपरेशन टायगरनंतर कुटुंबीयांसह म’श्‍वरमध्‍ये घालवला वेळ

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्‍वर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्‍वरमध्‍ये एका कौटुंबिक पूजेनिमित्त आपल्या कुटुंबीयांसमवेत मुक्‍कामी आले आहेत. म’श्‍वरमध्‍ये पावसाळी वातावरण तयार झाले आहे. दाट धुके, रिमझिम पाऊस अशा अल्‍हाददायक वातावरणात ना. एकनाथ शिंदे यांनी नातवासोबत ट्रॅक्‍टर सफारी केली. मुंबईच्‍या धावपळीतून काही निवांत क्षण कुटुंबीयांसमवेत घालवले. यावेळी खा. श्रीकांत शिंदे हेही उपस्‍थित होते.

काही दिवसांपूर्वी ना एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन टायगर' यशस्‍वी करत ६ खासदारांना आपल्‍या गोटात सामील करून राजकीय भूकंप घडवून आणला होता. सध्‍या मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशा धावपळीतून काहीसा निवांत वेळ कुटुंबीयांसोबत घालवण्यासाठी बुधवारी भल्या पहाटे ना. एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर येथे खासगी दौऱ्यानिमित्त दाखल झाले. त्‍यांचे कुटुंबीय एक दिवस आधीच येथे पोहचले होते. ना. शिंदे व खा. श्रीकांत शिंदे हे कौटुंबिक पूजेसाठी येथे आले आहे.

बुधवारी खा. शिंदे यांनी बाजारपेठेत फेरफटका मारला. यावेळी ते पर्यटकांच्‍या फोटोला पोज देतानाही दिसून आले. तर जि.प. सदस्‍य अजित संकपाळ, शहरप्रमुख विजय नायडू, अर्बन बँकेचे संचालक सतीश ओंबळे, सचिन गुजर, सचिन कदम यांच्‍यासमवेत चर्चा केली. ना. शिंदे हे गुरुवारी सकाळी बंगल्यामध्येच एका वेगळ्या अंदाजात पाहावयास मिळाले. दाट धुके रिमझिम पाऊस व कडाक्याच्या थंडीत या बंगल्याच्या परिसरात ना शिंदे हे आपला नातू रुद्रांश सोबत ट्रॅक्टरवर बंगल्याच्या परिसरात रपेट मारताना दिसले. त्‍यानंतर ते पुन्‍हा मुंबईकडे रवाना झाले. दरम्‍यान, महाबळेश्‍वर शहरातील हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे चौक सुशोभीकरणासाठी भरीव निधी लागणार आहे.

शिवसैनिक व अर्बन बँकेचे संचालक सतीश ओंबळे यांनी मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्यासमवेत ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निधीची मागणी केली. यावेळी ना. शिंदे यांनी ७५ लाखांचा निधी मंजूर केला. तसेच महाबळेश्‍वर शहरास अद्ययावत रुग्णवाहिका देण्‍याचीही ग्‍वाही दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT