Farmers Loan Waiver Pudhari File Photo
सातारा

Farmers Loan Waiver : २ लाखांवरील थकबाकीदारांनाही कर्जमाफीचा दिलासा

आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत एकरकमी समझोता (ओटीएस) योजनेचा लाभ मिळणाऱ्या पात्र शेतकऱ्यांसाठी घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांवरील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची ४१ हजार ५२६ पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती जिल्‍हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली.

योजनेच्या पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात आली. यामधील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये २५२.८८ कोटी रुपये वर्ग करण्‍यात आले आहे. आता योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ओटीएस अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दोन लाख रुपयांवरील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम बँकेत भरल्यानंतर त्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी बँकांकडील माहितीचे संगणकीय पद्धतीने संकलन करून ५ हजार ५७८ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. या लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

एकरकमी समझोता योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची यादी दि. १९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी ग्रामपंचायती, बँकांच्या शाखा तसेच विकास संस्थांच्या कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी आपले नाव, कर्जखात्याचा तपशील आणि इतर आवश्यक माहिती तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT