satara news
सातारा: तापोळा रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली  Pudhari photo
सातारा

महाबळेश्वर : तापोळा रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरापासून अंदाजे नऊ कि.मी. अंतरावर असलेल्या महाबळेश्वर-तापोळा या मुख्य रस्त्यावर चिखली शेड परिसरात बुधवारी मध्यरात्री महाकाय दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने तापोळा भागामध्ये जाण्यासाठी नागरिकांना मांघर या पार्यायी रस्त्याने जा-ये करावी लागली.

दोनच दिवसांपूर्वी याच परिसरात रस्त्याच्या एका बाजूला मोठे दगड माती खाली आल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. बुधवारी रात्री पुन्हा दरड कोसळली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गुरुवारी सकाळपासून दोन्ही बाजूने दगड, माती हटविण्याचे काम सुरू होते. त्यानंतर सायंकाळी हा रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

अनेक वेळा याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या असून, दरडी कोसळल्यानंतर त्या दूर करणे नेहमीचाच उपाय झाला आहे. दरडी कोसळूच नयेत, यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

SCROLL FOR NEXT