सातारा

Satara Crime: कुरणेवाडी दरोड्यातील टोळी जेरबंद

म्हसवड पोलिस व एलसीबीची संयुक्त कारवाई : 9 मेपर्यंत पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

म्हसवड : कुरणेवाडी येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील सात संशयितांना अवघ्या 48 तासांत म्हसवड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने जेरबंद केले. या कारवाईत सुमारे 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त केली आहे. दरम्यान, संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. 9 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दादा आण्णा बुधावले (वय 20), संजय आण्णा बुधावले (वय 23), महादेव आण्णा बुधावले (वय 22), हर्षद युवराज बुधावले (वय 19), ऋतिक भारत बनसोडे (वय 20) व दोन विधी संघर्षग्रस्त बालक सर्व (सर्व रा. वरकुटे मलवडी ता. माण जि. सातारा) अशी संशयीतांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुरणेवाडी येथील मिसाळ वस्तीमध्ये राहणारे प्रल्हाद ज्ञानू मिसाळ (वय 65) आणि त्यांची पत्नी सुलाबाई मिसाळ (वय 62) हे दि. 4 मे रोजी मध्यरात्री घराच्या सोप्यात झोपले असताना अज्ञातांनी घरात प्रवेश केला. त्यांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 72 हजार 200 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

एसपी निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हलवली. तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा शोध घेत त्यांना जेरबंद केले. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. 9 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे करत आहेत.

ही कारवाई म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप पोमण, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अनिल वाघमोडे, अमंलदार शहाजी वाघमारे, अमर नारनवर, जगन्नाथ लुबाळ, रुपाली फडतरे, धीरज कवडे, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, सतिष जाधव, हर्षद जाधव, रवी गुरव, शिवाजी गुरव, आमेल माने, सनी आवटे, अजय जाधव, अमित माने, प्रविण पवार, ओंकार यादव, संभाजी साळुंखे, स्वप्नील दौंड यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT