Koyna Dam 
सातारा

Koyna Dam: कोयनेत ९३.०२ टीएमसी पाणीसाठा

रविवारी संध्याकाळी कोयना धरणाच्या सहा वक्री दरवाजातून विनावापर सोडण्यात येणारे पाणी पूर्णपणे बंद करण्यात आले

पुढारी वृत्तसेवा

पाटण : कोयना धरणांतर्गत विभागात पावसाची उघडीप व प्रतिसेकंद सरासरी १०,७१९ क्युसेक आवक लक्षात घेता रविवारी संध्याकाळी कोयना धरणाच्या सहा वक्री दरवाजातून विनावापर सोडण्यात येणारे पाणी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

सध्या केवळ धरण पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून १०५० क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर अंतर्गत छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या प्रतिसेकंद सरासरी १०,७१९ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणात सध्या उपलब्ध ९३.०२ टीएमसी तर उपयुक्त ८७.९० टीएमसी पाणीसाठा आहे.

१ जूनपासून आत्तापर्यंत कोयना ३४६२ मिलिमीटर, नवजा ४२६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ १२.२३ टीएमसी पाण्याची गरज असून सध्या धरण ८८.३८ टक्के भरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT