Koyna Dam File Photo
सातारा

Koyna Dam: ‘कोयना’ पायथा वीजगृहातून पाणी सोडणार

कोयना धरणात ८१ टीएमसी पाणीसाठा

पुढारी वृत्तसेवा

पाटण : कोयना धरणांतर्गत विभागात सुरू असलेला दमदार पाऊस, धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण व सध्याचा एकूण उपलब्ध ८१.१२ टीएमसी पाणीसाठा आणि यापुढे उर्वरित २४.१३ टीएमसी पाणी साठवण क्षमता लक्षात घेता पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी बुधवारी (२९ जुलै) सकाळी ९ वाजता धरण पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद १०५० क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

पुढील काळात धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन त्या दृष्टीने पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पाणी सोडण्याचे वेळेनुसार नियोजन केले जाणार आहे. या सोडण्यात आलेल्या पाण्यासह पूर्वेकडील विभागात सुरू असलेल्या पावसामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने सावधानतेचा इशारा दिल्याची माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता महेश रासणकर यांनी दिली.

धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर अंतर्गत छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या सरासरी ३२,१९१ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. सध्या उपलब्ध ८१.१२ टीएमसी तर उपयुक्त ७६ टीएमसी पाणीसाठा आहे.१ जूनपासून आत्तापर्यंतचा पाऊस कोयना २७०२ मि.मी., नवजा ३२६० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. याच चोवीस तासांत धरणात २.४६ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ २४.१३ टीएमसी पाण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT