Koyna Dam 
सातारा

Koyna Dam: कोयना धरणाचे दरवाजे दोन फूटांवर

पाण्याची आवक घटल्याने संध्याकाळी सहा वाजता हे दरवाजे पुन्हा दोन फूट करण्यात आले

पुढारी वृत्तसेवा

पाटण : कोयना धरणांतर्गत विभागात पडणारा पाऊस व धरणाची संपुष्टात येत असलेली पाणी साठवण क्षमता लक्षात घेता रविवारी सकाळी धरणाचे सहा वक्री दरवाजे दोन फूटावरून तीन फूट वर उचलण्यात आले होते.

तथापि पाण्याची आवक घटल्याने संध्याकाळी सहा वाजता हे दरवाजे पुन्हा दोन फूट करण्यात आले आहेत. या दरवाजातून १४,२४४ व धरण पायथा वीजगृहातील एक जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून १०५० असे प्रतिसेकंद एकूण १५,२९४ क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदी पात्रात सोडण्यात आले आहे.

धरणातून सोडण्यात आलेले पाणी व पूर्वेकडे पडणारा पाऊस यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठची गावं, लोकवस्त्यांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर अंतर्गत छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या प्रतिसेकंद सरासरी १६,११६ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT