अशा पद्धतीने कासपठार फुलांनी बहरले आहे. pudhari Photo
सातारा

‘कास’ पठार फुलांनी बहरू लागले!

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठाराने यंदा स्वर्गीय फुलांचा खास शालू पांघरायला लवकर सुरुवात केली आहे. कासवरील कुमदिनी तलाव पावसाने भरला आहे; तर सभोवतीचे पूर्ण पठार हिरव्यागार झाडा-वेलींनी बहरून गेले आहे. गेंद, भुई कारवी, चवर, वायुतुरा (सातारी तुरा), पंद पिंडा कोकंणांसीस, विघ्नहर्ता (हलुडा) अशी रंगीबेरंगी फुले फुलली आहेत. त्यामुळे पर्यटकांना आता कासचे वेध लागले आहेत.

भुईकारवी : भुईकारवी ही जमिनीवर टोपलीसारखा आकार असणारी फुले आहेत. याच्या पानांना छोटे पांढरट रंगाचे केस असतात. सूर्याचे किरण पडल्यावर सुंदर व मोहक दिसतात. पठारावर आता त्यांचा नजारा सुरू झाला आहे.

गेंद : धनगरी फेट्याप्रमाणे गवताच्या दांड्यावर टोपीसारखा भाग असणारी गेंद ही फूल वनस्पती आहे. यामध्ये तीन जाती आहेत. सीतेची आसवे, धनगर गवत, तेरडा याचे एकत्रित फुललेले द़ृश्य पर्यटकांसाठी पर्वणी असते. ही फुले उमलण्यास सुरुवात झाली आहे.

पठार यंदा गतवर्षीपेक्षा जादा फुलणार...

  • पावसाने यंदा वेळीच आणि जोरदार बॅटिंग केली. त्यातच वन विभागाच्या वतीने गतवर्षी हंगाम संपल्यानंतर कंपाऊंडला जाळ्या लावून बंदिस्त केलेले कुंपण मोकळे केले होते.

  • यामुळे पठारावर जनावरे चरायला सोडण्यात आली. गवे, रानडुकरे, बिबटे असे वन्यजीव मोकळेपणाने पठारावर फिरू लागले.

  • त्यांच्या विष्ठेमुळे पठारावरील दुर्मीळ फूलझाडांचे चांगले पोषण होत आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पठार चांगले फुलणार आहे.

  • पर्यटकांना कास पठारावर आढळणार्‍या ‘एकमेवाद्वितीय’ फुलांचा नजारा पाहण्याची पर्वणी मिळणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT