मृत सुनील  
सातारा

Karad Crime: अनैतिक संबंधातून युवकाचा काढला काटा

चाफळमधील घटनेचे मलकापूरमध्ये पडसाद

पुढारी वृत्तसेवा

कराड : महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून चिडून जात दोघा युवकांनी चाफळ (ता. पाटण) येथील युवकाचा कायमचा काटा काढल्याची धक्कादायक घटना रात्री दोनच्या सुमारास मलकापूरमध्ये घडली. कोयत्याने हल्ला करत हा खून केला असून, पलायन केलेल्या दोन्ही संशयितांना ६ तासांत गजाआड करण्यात कराड शहर पोलिसांना यश मिळाले.

सुनील नाथा चव्हाण असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सूरज दीपक चव्हाण (चाफळ) आणि अक्षय सुरेश म्हेत्रे (कोरेगाव, ता. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. त्या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सहा दिवस पोलिस कोठडी सुनावली. सुनील चव्हाण हा कराड - मलकापूर येथे खाद्य पदार्थ डिलिव्हरीचे काम करत होता आणि त्याचे सूरज चव्हाण याच्याशी संबंधित एका महिलेशी अनैतिक संबंध होते. दोन वर्षांपासून सुरू असणाऱ्या या प्रेमसंबंधामुळे काही दिवसांपासून संबंधित महिलेला घेऊन कुटुंबीय साताऱ्यात वास्तव्यास होते.

मात्र, त्यानंतरही सुनील चव्हाण आणि संबंधित महिला यांच्यात संवाद सुरूच होता. याचाच राग मनात धरून सूरज चव्हाण याने मित्र अक्षय म्हेत्रे याच्या मदतीने शनिवार सायंकाळपासून सुनील चव्हाण याच्यावर पाळत ठेवली होती. रात्री दोनच्या सुमारास सुनील चव्हाण काम संपविल्यानंतर मलकापूरमधील लाहोटीनगर परिसरातून जात असताना दबा धरून बसलेल्या संशयितांनी कोयत्याने वार करत सुनील चव्हाण याच्या डोक्यासह शरीरावर वार केले.

अक्षय म्हेत्रे यानेच सुनील चव्हाण याच्यावर पहिला वार केला. त्यानंतर दोन्ही संशयितांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सुनील चव्हाण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र संशयितांनी पलायन केले होते.

सीसीटीव्ही अन्‌‍ संपर्कातून उकलले गूढ

पोलिसांनी घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केल्यानंतर दोन्ही संशयितांबाबत माहिती समोर आली. त्यानंतर मोबाईल संपर्कातून मिळालेल्या माहितीनंतर दोन्ही संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी खुनासाठी वापरलेले कोयते आणि वाहने जप्त केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT