Murder Case Pudhari
सातारा

Karad Murder Case: प्रेम प्रकरणातून महिलेचा खून; प्रियकर अटकेत

कराडमधील घटना; संशयिताने गळ्यावर पाय ठेवून गळा दाबल्याचे प्राथमिक चौकशीतून निष्पन्न

पुढारी वृत्तसेवा

कराड : प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या संशयाचे पर्यवसान महिलेच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना कराड शहरात घडली. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमजवळील झोपडपट्टी परिसरात गुरुवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास प्रियकराने महिलेच्या गळ्यावर पाय देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जखमी महिलेचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून संशयित प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

सागर महादेव माने (रा. जुने मालखेड, ता. कराड) असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी मध्यरात्री अडीचच्‍या सुमारास सागर माने याचा प्रेयसी महिलेशी वाद झाला आणि या वादावेळी त्याने प्रेयसीच्या गळ्यावर पाय ठेवून गळा दाबला.

संशयित स्वत:च पोलिस ठाण्यात हजर

प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या संशयाचे पर्यवसान महिलेच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना कराड शहरात घडली. यामध्ये संशयिताने हाताने तिचा गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची समजूत होऊन संशयित सागर माने याने स्‍वतः शहर पोलीस ठाणे गाठले आणि रात्री २.४५ वाजण्याच्‍या सुमारास त्यानेच या घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शहर पोलीस ठाण्याच्‍या पोलिस उपनिरीक्षक दिपाली कांबळे, पोलिस उपनिरीक्षक मदने, सहाय्यक फौजदार खाडे, पोलिस कॉन्स्टेबल काटरे, देशमुख, विभुते आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी संबंधित महिला तिच्या राहत्या घरात बेशुद्धावस्थेत आढळून आली. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना माहिती देऊन तिला तत्काळ उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी दोनच्‍या सुमारास जखमी महिलेचा मृत्यू झाला.

दरम्यान, संबंधित महिलेच्या मुलाने कराड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कराड शहर पोलिस ठाण्यात खुनासह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT