crime Pudhari
सातारा

Karad crime: दारूसाठी शंभर रुपये न दिल्याने भोसकले

आगाशिवनगरमधील घटना; एकजण गंभीर

पुढारी वृत्तसेवा

कराड : आगाशिवनगर (मलकापूर) येथील एका दारू दुकानासमोर शंभर रुपये न दिल्याने चिडून मजुरास चाकूने भोसकलेे. संतोष पोपट सूर्यवंशी (रा. मलकापूर) असे जखमीचे नाव असून, कराड शहर पोलिस ठाण्यात अनोळखी संशयिताविरोधात गुन्हा नोंद झाला असून ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

सूर्यवंशी हे बांधकाम मजूर म्हणून काम करतात आणि मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ते दारू पिण्यासाठी आगाशिवनगरमधील एका देशी दारू दुकानात गेले होते. दुकानाबाहेरच एका व्यक्तीने सूर्यवंशी यांच्याकडे दारू पिण्यासाठी 100 रुपयांची मागणी केली. मात्र आपल्याकडे 100 रुपये असून, आपण 50 रुपयांची दारू पिणार असून उर्वरित पैशातून मुलांना खाऊ घेणार असल्याचे सूर्यवंशी यांनी त्या व्यक्तीला सांगत पैसे देण्यास नकार दिला.

त्यामुळे चिडून अचानकपणे संशयिताने चाकूने सूर्यवंशी यांना भोसकले जखमी अवस्थेत सूर्यवंशी घरी गेले आणि त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT