डॉ. अतुलबाबा भोसले  
सातारा

Karad News : कराड दक्षिणेतील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होणार

अर्थसंकल्पात 33.67 कोटींच्या विकासकामांना मंजुरी; आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश

पुढारी वृत्तसेवा

कराड : मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना, कराड दक्षिणमधील विकासकामांना मोठया प्रमाणावर निधी मंजूर केला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कराड दक्षिणमधील 33 कोटी 67 लाख रुपयांच्या विकासकामांना अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. यामुळे कराड दक्षिणमधील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होणार आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणण्यासाठी आ.डॉ. अतुलबाबा भोसले सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात कराड दक्षिणमधील रस्ते सुधारणा व पुलांच्या बांधकामांसाठी भरघोस निधी मिळावा, यासाठी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातात्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेत ना. देवेंद्र फडणवीस यांनी नाबार्ड व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध विकासकामांसाठी 33 कोटी 67 लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर केला आहे.

यामध्ये कराड दक्षिणमधील राष्ट्रीय महामार्ग ते कोयना वसाहत - जखिणवाडी - नांदलापूर - पाचवड फाटा - मुनावळे - कालेटेक - नारायणवाडी - आटके जाधव मळा - ठोंबरे मळा - रेठरे बुद्रुक रस्त्याची नवीन रिटेनिंग वॉल बांधण्यासह रस्ता सुधारणा करणे (3 कोटी), राष्ट्रीय महामार्ग ते कोयना वसाहत - जखिणवाडी - नांदलापूर - पाचवड फाटा - मुनावळे - कालेटेक - नारायणवाडी - आटके जाधव मळा - ठोंबरे मळा - रेठरे बुद्रुक रस्त्याची सुधारणा करणे (3 कोटी), राष्ट्रीय महामार्ग पाचवडेश्वर - कोडोली - दुशेरे - शेणोली स्टेशन रस्ता सुधारणा करणे (1 कोटी), येणके - आणे - कोळे - कोळेवाडी ते पुनर्वसित घारेवाडी रस्त्याची सुधारणा करणे (2 कोटी), आटके टप्पा ते आटके जाधव मळा - रेठरे बु. व्हाया डंगारे वस्ती - पवार मळा - खुबी रस्ताची सुधारणा करणे (1.50 कोटी), कालेटेक - काले - संजयनगर - कालवडे - नांदगाव - साळशिरंबे - पाचुंब्री रस्ता सुधारणा करणे (3 कोटी),

वाखाण वस्ती कराड - ढेबेवाडी रस्ताची सुधारणा व दुतर्फा बंदिस्त गटर बांधकाम करणे (1.50 कोटी), वाखाण वस्ती कराड ते ढेबेवाडी रस्त्याच्या बैलबाजार ते ढेबेवाडी फाटा काँक्रीट रस्त्याचे चौपदरीकरण बांधकाम करणे (10 कोटी), नांदगाव दक्षिण मांड नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे (6.73 कोटी), कराड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करणे (1.93 कोटी) अशा एकूण 33 कोटी 67 लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT