Burglary Pudhari
सातारा

Karad burglary: शेणोलीत घरफोडी: 2 लाखांचा ऐवज लंपास

शेणोली ता.कराड येथे बंद घराचा दरवाजा उचकटून कपाटातील दागिने व रोख रक्कम 50 हजार असा 2 लाख 8 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला

पुढारी वृत्तसेवा

कराड : शेणोली ता.कराड येथे बंद घराचा दरवाजा उचकटून कपाटातील दागिने व रोख रक्कम 50 हजार असा 2 लाख 8 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत प्रसाद प्रकाश कणसे रा. शेणोली यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संबंधित कुटुंबीय दि. 14 मे रोजी नातेवाईकांकडे गेले होते. दि. 15 मे रोजी सकाळी घरी परतल्यानंतर घराचे लाकडी दरवाजे व दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरातील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. त्यांनी इतरत्र तपासणी केली असता सोन्याची मंगळसूत्रे, कानातील दागिने, अंगठ्या, चांदीचे दागिने तसेच सुमारे 50 हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

फिर्यादी प्रकाश कणसे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दागिने चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT