सातारा

Karad Police Van Fire : आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनला आग

कर्मचारी, आरोपी सुरक्षित बाहेर

पुढारी वृत्तसेवा

कराड : कराड तालुका पोलिस ठाण्यातंर्गत विविध गुन्ह्यातील संशयितांना घेऊन निघालेल्या पोलिस व्हॅनने गजबजलेल्या भेदा चौकात अचानक पेट घेतला. आगडोंब उसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अग्निशमनसह पोलिस, नागरिकांच्या तत्परतेने आग आटोक्यात आली. आगीत व्हॅनचे मोठे नुकसान झाले मात्र, सुदैवाने वाहनातील कोणीही जखमी झाले नाही. पाच संशयितांसह सहा पोलिस वाहनात होते. आगीची चाहूल लागताच सर्वांनी सुरक्षित स्थळी पळ काढल्याने हानी टळली. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगल्या गुन्ह्यात पाच संशयितांना सातारा येथे नेण्यात येत होते. पोलिस व्हॅन शहर पोलिस ठाण्याची आहे. त्यात पाच पोलिस व चालक अशा सहा कर्मचाऱ्यांचा समावेश होता. व्हॅन भेदा चौकात येताच शाॅर्टसर्किट झाले. त्यात व्हॅनने पेट घेतला. त्यामुळे गदारोळ उडाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT