कराड : सातारा जिल्ह्यातील कराड शहरात बसस्थानक परिसरात आम्ही भाई आहोत असे म्हणत मंगळवारी रात्री दोघांवर कोयत्याने सशस्त्र हल्ला करणार्या सात जणांना कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्यात कराडमधील इरफान आसिफ पठाण आणि दर्शन शिंदे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
हल्ला केल्यानंतर सातही संशयित मुंबईत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर कराड शहर पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले आहे. साद अश्पाक मुलाणी (आझाद चौक, कराड), हुजेफा शब्बीर शेख (गुरूवार पेठ, कराड), सद्दाम गौसपाक शेख (कार्वे नाका, कराड), शोएब मोमीन (रैनाक गल्ली, कराड), फरहान शेख (मुजावर कॉलनी, कराड), अकरम मुल्ला (पाली, ता. कराड) अशी संशयितांची नावे आहेत.
त्यांना शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता 13 एप्रिलपर्यत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी दिला असल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली आहे.