सातारा : कराड उत्तरमधील विविध विकासकामांसाठी 96 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. कराड उत्तरचे आ. मनोजदादा घोरपडे यांनी सातत्याने पाठपुरावा करुन ही विकासकामे मंजूर करुन आणली आहेत.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघामधील गावांना विकास निधी उपलब्ध झालेला आहे. यामध्ये कोणेगाव (ता. कराड) येथे रस्ता काँक्रीटीकरणासाठी 10 लाख, कोर्टी येथे सभामंडप बांधण्यासाठी 10 लाख, बाबरमाची येथे सभामंडपसाठी 5 लाख, भगतवाडीत गटर बांधण्यासाठी 10 लाख, मसूर येथे स्मशानभूमी शेड करण्यासाठी 8 लाख, अपशिंगे (मि.) येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी 10 लाख, गुजरवाडी येथे रहिमतपूर-तारगाव रोड ते मारुती मंदिरपर्यंत काँक्रीटीकरण करण्यासाठी 10 लाख, पिंपरी येथे झेंडा चौकात काँक्रीटीकरण करण्यासाठी 10 लाख, बोरगाव येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी 8 लाख, वेणेगाव, ता. सातारा येथे रस्ता काँक्रीटीकरणासाठी 5 लाख, विरवडे येथे सभामंडप बांधण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामांमुळे गावातील दळणवळण सुलभ होणार आहे.