माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  File Photo
सातारा

Karad News: कराडला महाविकास आघाडीबाबत सस्पेन्स

पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चेनंतर अंतिम निर्णय

पुढारी वृत्तसेवा

कराड : कराड नगरपालिकेत भाजपाला रोखण्यासाठी लोकशाही आघाडी आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ग्रीन सिग्नलनंतरच अंतिम निर्णय होणार आहे. त्याचवेळी शिवसेना (शिंदे गट) कडूनही भाजपाविरोधात विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यास कितपत प्रतिसाद मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. एक ते दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल.

कराड नगरपालिकेसाठी भाजपाकडून तब्बल 104 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा 16 जणांनी अर्ज केले आहेत. शिवसेना (शिंदे गट) कडूनही यापूर्वीच नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्रसिंह यादव यांचे नाव जाहीर केले आहे. या घडोमाडीवेळीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये महाविकास आघाडीच्या स्थापनेबाबत चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यातील चर्चेनंतरच अंतिम निर्णय होणार आहे. मात्र, असे असले तरी लोकशाही आघाडीचे पालिका सभागृहात प्रतिनिधित्व केलेले विरोधी गटनेते सौरभ पाटील यांच्याच नावावर शिक्कातोर्तब होईल, अशी परिस्थिती असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. जागा वाटपाबाबत सुद्धा दोन्ही काँग्रेसमध्ये प्राथमिक चर्चा झाली असून सक्षम उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुद्धा सुरू आहे.

एकीकडे अशी परिस्थिती असतानाच शिवसेना (शिंदे गट) नेते राजेंद्रसिंह यादव यांनी त्यांच्या गटाकडूनही दोन्ही काँग्रेसला सोबत घेण्यासाठी वाटाघाटी सुरू केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते ॲड. उदयसिंह पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळेच राजेंद्रसिंह यादव यांची भिस्त ॲड. उदयसिंह पाटील यांच्यावरच असल्याचेही सांगितले जात आहे. राजेंद्रसिंह यादव यांच्या नावास लोकशाही आघाडीसह काँग्रेसकडून पसंती मिळणार का ? याबाबतही उत्सुकता आहे. त्यामुळेच भाजपाविरोधात सर्व विरोधक एकत्र येणार का ? हे आगामी एक ते दोन दिवसात स्पष्ट होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT