कराड : कराड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2015 च्या अनुषंगाने दि. 10 ते 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत नगराध्यक्ष व नगरसेवक पदांकरीता दाखल केलेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी मंगळवार दि. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 5 यावेळेत स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्र, शनिवार पेठ कराड येेथे झाली सर्वप्रथम नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी कराड नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी जाहीर केली. यावेळी निवडणूक निरीक्षक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणेच्या उपमहाव्यवस्थापक श्रीमती ज्योती कावेरी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत व्हटकर उपस्थित होते.
नगराध्यक्षपदासाठी एकूण 22 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 17 अर्ज वैध ठरले असून 5 अर्ज अवैध ठरलेले आहेत. वैध ठरलेली नामनिर्देनपत्र विनायक पावसकर दोन (भाजप), झाकीर पठाण (काँग्रेस/अपक्ष), राजेंद्रसिंह यादव (यशवंत विकास आघाडी/ शिवसेना), अल्ताफ शिकलगार (अपक्ष), रणजीत पाटील (तीन अपक्ष), इमरान मुल्ला (बसप), गणेश कापसे (अपक्ष), श्रीकांत घोडके (अपक्ष), शरद देव(अपक्ष), बापू लांडगे (अपक्ष). तर अवैध (अपात्र) ठरलेली पाच आवेदनपत्र पुढील प्रमाणे अल्ताफ शिकलगार, सुहास जगताप, रणजीत पाटील (शिवसेना), राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर. नगरसेवक पदासाठी 330 अर्ज प्राप्त झाले होते. 330 अर्जांपैकी छाननीमध्ये 72 अर्ज अवैध ठरले आहेत. तर एक अर्ज सुनावणीनंतर निर्णयावर राखीव ठेवण्यात आलेला आहे.