सातारा

Karad MD drugs seizure | कराडात एमडी ड्रग्जचा साठा जप्त : तिघाजणांना अटक

वारुंजी फाटा येथे पोलिसांची कारवाई; 19 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

कराड : कराड शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत 95.78 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त केले असून तिघांना अटक केली आहे. या कारवाईत अमली पदार्थांसह कार, मोबाईल फोन असा एकूण 18 लाख 82 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, काहीजण वारुंजी फाटा परिसरात कारमधून एमडी मेफेड्रोन विक्रीसाठी येणार आहेत.

पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. यावेळी समीर गुलाब शेख (रा. कोयनानगर वसाहत), नजर महंमद आरिफ मुल्ला (रा. मुजावर कॉलनी) व फरदीन दादापीर शेख (रा. सूर्यवंशी मळा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 2 लाख 87 हजार 340 रुपये किंमतीचे 95.78 ग्रॅम एमडी मेफेड्रोन जप्त केले. तसेच तीन मोबाईल फोन व एक कार जप्त केली.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आरोपींवर गुन्हा दाखल झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT