Leopard Pudhari File Photo
सातारा

Karad Leopard Accident : कराडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी

जखमी अवस्थेत तसाच उसाच्या शेतात निघून गेला; वन विभागाकडून शोध मोहीम

पुढारी वृत्तसेवा

उंडाळे : पुणे-बेंगळूर आशियाई महामार्गावर कराडजवळ पाचवड फाटा येथे बर्गर किंगजवळ रात्री नऊ ते दहाच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला. परंतु जखमी अवस्थेत तो तसाच उसाच्या शेतात निघून गेला. वन विभागाकडून त्याची शोध मोहीम घेण्यात आली. मात्र, बिबट्या सापडला नाही.

शुक्रवारी रात्री नऊ ते दहाच्या सुमारास महामार्गावरून आगाशिव डोंगराच्या बाजूने हायवे ओलांडत असताना हॉटेल मामाचा मळा समोर बिबट्या जखमी अवस्थेत आला. येथून पुढे तो जखमी अवस्थेतच सर्विस रस्त्याने लंगडत पुढे जात होता. त्याचवेळी बिबट्याला पाहिल्यानंतर परिसरातील नागरिकांची घाबरगुंडी उडाली. अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाल्याने तो मंद गतीने लंगडत चालत होता. तो जखमी असल्याचे लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी बिबट्याचे छायाचित्र व व्हिडिओ चित्रिकरण घेण्याचा मोह आवरला नाही. सुमारे २० ते २५ मिनिटे बिबट्या सर्विस रस्त्यावरून चालत तो मॅकडोनाल्ड व बर्गर किंग जवळ गेला. तेथून तो बाजूच्या उसाच्या शेतात निघून गेला.

बिबट्या जखमी झालेल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. तेंव्हा वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत बिबट्या निघून गेला होता. रात्री वनविभागाने बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो आढळून आला नाही. त्यातचे हायवे लगत कृष्णा नदी व उसाचे क्षेत्र अधिक असल्याने तो परिसरात कुठे लपून बसला हे लक्षात आले नाही. परंतु तोपर्यंत परिसरातील लोकांची घाबरकुंडी उडाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT