Karad MD Drugs Case 
सातारा

Karad MD Drugs Case: एमडी ड्रग्ज प्रकरणात कराडातील रेकॉर्डवरील गुंडास अटक

जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, या चौकशीतून ड्रग्ज पुरवठा साखळीतील आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

कराड : वारूंजी फाटा (ता. कराड) येथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक केल्यानंतर कराड शहर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत शहरातील रेकॉर्डवरील गुंड आरोपी आसिफ शेख (रा. कराड) याला अटक केली आहे.

जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, या चौकशीतून ड्रग्ज पुरवठा साखळीतील आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलिसांनी वारूंजी फाटा येथे नियोजनबद्ध सापळा रचून एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक केली होती.

या कारवाईत ५.७८ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज, तीन मोबाईल फोन आणि एक इनोव्हा कार असा एकूण १८ लाख ८२ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या कारवाईनंतर सुरू असलेल्या तपासादरम्यान पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्याच्या आधारे आरोपी आसिफ शेख याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT