Fake Obscene Videos | कराडमधील दोन डॉक्टरांसह चौघांचे बनावट अश्लील व्हिडीओ  File Photo
सातारा

Fake Obscene Videos | कराडमधील दोन डॉक्टरांसह चौघांचे बनावट अश्लील व्हिडीओ

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडीओ बनविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार

पुढारी वृत्तसेवा

कराड : कराड शहरातील महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि एका युवक - युवतीची एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडीओ बनविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ परराज्यातून बनवून घेण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून, याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मागील महिन्यात 20 मे रोजी एका युवतीला एका अनोळखी व्यक्तीने व्हॉटस् अ‍ॅपवरील एका ग्रुपमध्ये समाविष्ट केले होते. त्या ग्रुपमध्ये 26 अन्य लोकांना समाविष्ट करण्यात आले होते. त्याच मध्यरात्री संबंधित व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर एक महिला डॉक्टर आणि या महिला डॉक्टरशी ओळखसुद्धा नसणार्‍या अन्य एका डॉक्टरचे फोटो वापरून तयार केलेला अश्लील व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. त्याच कालावधीत या ग्रुपवर दुसरा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये संबंधित तक्रारदार युवतीचा एका युवकासोबत अश्लील व्हिडीओ बनविण्यात आल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे व्हिडीओ बनविताना मजकूर, व्हिडीओला अश्लील भाषेतील आवाज सुद्धा जोडण्यात आला होता. या धक्कादायक प्रकारानंतर संबंधित युवतीने माहिती घेत ज्या - ज्या लोकांचे अश्लील व्हिडीओ बनविले आहेत, त्या सर्वाना शोधून काढत कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यानंतर याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे समोर आले आहे.

व्हिडीओसाठी कॉल करत पैसे पुरविल्याचे निष्पन्न...

या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. परराज्यातून व्हिडीओ बनवून घेण्यासाठी त्याने पैसे दिल्याचे परराज्यातील संशयिताकडून पोलिसांना समजले आहे. त्याचबरोबर संबंधिताचे काही साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असून, संशयित डॉक्टरकडे चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT