कराड : राजेंद्रसिंह यादव यांचा सत्कार करताना कादर नायकवडी व इतर. Pudhari Photo
सातारा

Karad News | कराडच्या वाढीव भागात 194 कोटींचे रस्ते प्रस्तावित : राजेंद्रसिंह यादव

दौलत, रेव्हिन्यू कॉलनीत फेज टू कामांचा शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

कराड : कराड शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासाचा एकही प्रश्न आगामी काळात शिल्लक ठेवणार नाही. पाणी पुरवठा, भुयारी गटार योजनेसह सुमारे 194 कोटी रुपयांचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. या भागाचा विकास करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, लवकरच या भागातील नागरिकांना सर्व सुविधा देणार आहे, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांनी केले.

कराड शहर वाढीव भागामध्ये असणारी ड्रेनेज लाईनची समस्या लक्षात घेऊन शिवसेना नेते व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी लक्ष घालून दौलत आणि रेव्हिन्यू कॉलनी येथे भुयारी गटार योजनेच्या फेज 2 कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राजेंद्रसिंह यादव म्हणाले, हद्दवाढ भागात घरे अगोदर झाली. त्यानंतर मागणीप्रमाणे मुलभूत सुविधा होत आहेत. मात्र यात एकसुत्रीपणा नसल्याने पाणी पुरवठा व ड्रेनेजच्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून 325 कोटींचा निधी निधी मंजूर झाला आहे. यात सुमारे दोनशे कोटी हद्दवाढ भागासाठी आहेत.

हद्दवाढ भागात घनकचरा प्रकल्पाशेजारी 11 लाख लीटरची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याची समस्या संपुष्टात येईल. हद्दवाढ भागात 194 कोटींचे रस्ते प्रस्तावित केले आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार असणार आहेत. 2056 साली शहराची लोकसंख्या गृहीत धरून पाणी योजना, भुयारी गटार योजनेची कामे होणार आहेत. त्यामुळे या भागात वेगाने नागरीकरण होईल, असेही यादव यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते निशांत ढेकळे, शिवराज इंगवले, विनोद भोसले, अनिस भालदार, निशांत ढेकळे, प्रवीण पवार, मुसा मुजावर, फैजल बागवान, इस्माईल मुल्ला, कादर नाईकवाडी, टिपू मुल्ला, आसिफ शेख, शाहरुख मुल्ला, समीर दिवाण, रियाज मोमीन, अयान शेख, सैफ मुजावर, विक्रम मोहिते,अदनान शेख, इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT