सातारा

Karad drunk and drive case: कराडात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार

माजी नगरसेवकासह महिला गंभीर जखमी; नागरिकांनी केला पाठलाग

पुढारी वृत्तसेवा

कराड : कराड शहरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्ह थरार पहावयास मिळाला. शेवाळवाडी उंडाळे येथील मद्यपी चालकाने भरगाव वेगात कार चालून माजी नगरसेवकासह दोघांना अक्षरश: चिरडले आहे. माजी नगरसेवकावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर जखमी महिलेवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सिद्धार्थ महादेव थोरवडे (रा. बुधवार पेठ कराड) आणि सुरय्या इब्राहिम शिकलगार (रा. मंगळवार पेठ कराड) अशी दोन्ही जखमींची नावे आहेत. अक्षय संभाजी शेवाळे (शेवाळेवाडी उंडाळे) असे मद्यपी चालकाचे नाव आहे. अक्षय शेवाळे रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याच्या ताब्यातील कारभारगाव वेगात मद्यधुंद अवस्थेत चालवत होता. यावेळी भरधाव वेगातील कारने बुधवार पेठ आणि मंगळवार पेठ परिसरात सिद्धार्थ थोरवडे आणि सुरय्या शिकलगार यांना जोरदार धडक दिली. सिद्धार्थ थोरवडे यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर शिकलगार यांच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन्ही जखमींना धडक देत अक्षय शेवाळे भरधाव वेगात कार चालवीत असल्याने परिसरातील नागरिकांनी व वाहन चालकांनी त्याचा पाठलाग केला. कार मंगळवार पेठ येथील कन्या शाळा परिसरात आल्यानंतर रस्त्यावरील दुभाजकावरून उडून पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे या परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी भेट परिस्थिती आटोक्यात आणली. दोन्ही जखमींचे प्रकृती स्थिर असून मद्यपी चालकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT