सातारा

कराड : गाय चोरणारे पोलिसांच्या ताब्यात

backup backup

कराड : पुढारी वृत्तसेवा

बेलदरे, ता. कराड येथून सहा गाय चोरणार्‍यांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत शिवाजी रघुनाथ चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, बेलदरे येथील शिवाजी रघुनाथ चव्हाण यांच्यासह अन्य शेतकरी गावानजीकच्या चंदोबा डोंगरात गाई चरण्यासाठी सोडतात. 9 एप्रिल रोजी शिवाजी चव्हाण यांनी चार गाय डोंगरात चरायला सोडल्या होत्या. सायंकाळी नेहमीप्रमाणे शिवाजी चव्हाण हे गाईंना परत आणण्यासाठी डोंगरात गेले असता त्यांना एकच गाय आढळली. तीन गाई त्यांना सापडल्या नाहीत. त्यानंतर 16 एप्रिल रोजी नामदेव चव्हाण यांचीही गाय अचानक गायब झाली. तसेच शिवाजी आनंदा जाधव, गणेश खाशाबा मदने यांचीही प्रत्येकी एक-एक गाय गायब झाली. त्यामुळे ग्रामस्थांनी पाळत ठेवून चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

SCROLL FOR NEXT