कराड; पुढारी वृत्तसेवा : दै. पुढारी कस्तुरी क्लब कराड नववर्षाच्या उत्साहात भर घालत मनोरंजनाच्या धमाकेदार कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. यावेळी सोनी मराठीवरील लोकप्रिय कलाकारांबरोबर कस्तुरी सभासद आनंदोत्सव साजरा करत लावणी कार्यक्रमाचा आनंद घेणार आहेत.
कस्तुरी क्लबतर्फे नेहमीच दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी कस्तुरी क्लब सभासदांसाठी सादर होत असते. या वर्षाच्या सुरुवातीलाच मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम असा मनोरंजनाचा डबल धमाका सौ. वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृह, कराड येथे मंगळवारी (दि. 10) दुपारी ठीक 1 वाजता कस्तुरी क्लबकडून आयोजित करण्यात येत आहे.
यावेळी सोनी मराठी वाहिनीवरील 'जीवाची होतीय काहिली' या मालिकेतील राज हंचनाळे (अर्जुन), प्रतीक्षा शिवणकर (रेवती), 'आशीर्वाद तुझा एकविरा आई' या मालिकेतील मयुरी वाघ (एकवीरा देवी) तसेच आगामी प्रतिशोध मालिकेतील अमोल बावडेकर (ममता, आई), पायल मेमाणे (डी) यांची प्रमुख उपस्थति असणार आहे.
या कलाकारांसोबत गप्पा, प्रश्नोेत्तरे आणि गंमतीशीर खेळत त्यांच्या शूटिंगदरम्यान होत असलेल्या गंमती जमती प्रत्यक्ष कलाकारांच्या तोंडून ऐकण्याची, जाणून घेण्याची संधी कस्तुरींना मिळणार आहे.
महिलांच्या नवीन वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण आणि जल्लोषाने करण्यासाठी सुमन थिएटर्स प्रस्तुत लावणी सम्राज्ञी योगिता माने यांच्या बहारदार लावण्यांचा आनंद याच कार्यक्रमाच्या सोबतीने मिळणार आहे. रोजच्या कामाच्या रुटीनमधून मनाला आराम देत लावणी सादरीकरणात धम्माल करण्यासाठी कस्तुरी सज्ज झाल्या आहेत. यावेळी पारंपरिक लावण्यासोबत सध्याच्या चित्रपटातील लावण्या सादर केल्या जाणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8010760449 या क्रमांकावर.