Jaykumar Gore on Rohit Pawar
सातारा : शरद पवारांपासून ते रोहित पवारांपर्यंत या सगळ्यांनीच कुरघोडी करून पोलिसांचा वापर केला आहे. राजकारणातील अनेक नव्या पिढ्या उध्वस्त केल्या. त्यामुळेच त्यांना असं वाटत असेल की ते जसे वागले तसेच आम्ही वागत आहोत. रोहित पवार मोठ्या घराण्यात जन्माला आले असले तरी त्यांची राजकीय उंची छोटी आहे. त्यांना संघर्ष करावा लागला नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या राजपुत्राला कसं कळेल दुख,वेदना काय असतात असा टोला मंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांना लगावला आहे.
पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. माझ्या कामाला या छोट्या माणसाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. राजकारण करताना माझं कधीही पवार कुटुंबियांशी जमलं नाही. मी सामान्य माणसाचे काम करतो. मी कधी पवार कुटुंबीयांच्या पाया पडलो नाही ही माझी चूक असावी. यांनी नेहमी खालच्या दर्जाचे राजकारण केलं आहे ,अशी टिकाही गोरे यांनी केली.
ज्यांची चौकशी झाली आहे त्यांना बोलू द्या रोहित पवारांनी वकिली करु नये. तुषार खरात हे पीकच त्यांचे आहे. त्यांनी नेहमी असे मोहरे तयार केले आणि त्यातून त्रास दिला. मग तीन कोटी रुपयांच्या खंडणीत पण त्याचा वाटा होता का असा सवाल देखील गोरे यांनी उपस्थित केला आहे.