Jawali Rain Pudhari
सातारा

Jawali Rain: जावलीत थैमान; घरावर कोसळले झाड

विजांचा कडकडाट थरकाप उडवणारा : वीजपुरवठा खंडित

पुढारी वृत्तसेवा

मेढा : जावली तालुक्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून मेढ्यात गांधीनगर येथे एका घरावर झाड कोसळून नुकसान झाले.

जावली तालुक्यात बुधवारी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला ढग दाटून आले आणि त्यानंतर गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे गारवा निर्माण झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. काही भागांत वीज पुरवठा खंडित झाल्याचीही माहिती मिळत आहे. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट, गारा आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे अनेक भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी किरकोळ नुकसानही झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात मोठा बदल होत असून वातावरणात गारवा निर्माण होत आहे. विशेषतः महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यातील कुडाळ, मेढा, करहर, पाचगणी, रुईघर, म्हसवे, सरताळे, सर्जापूर, बेलावडे, सोनगाव आणि आलेवाडी या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही भागांत विजांचा कडकडाट इतका तीव्र होता की नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, नागरिकांनी आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT