सातारा

Satara Crime: सातारा शहरात अवैध दारु वाहतूक; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैध दारु वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत सुमारे 4 लाख 49 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैध दारु वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत सुमारे 4 लाख 49 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी किकली, ता. वाई येथील युवकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित प्रताप विजय बाबर (वय 30, रा. सदरबझार सातारा, मूळ रा. किकली ता. वाई जि. सातारा) हा कार ( क्र. एमएच 11 डीए 3160) मधून व्हिस्की व बिअरची अवैध वाहतूक करत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि अविनाश माने यांना मिळाली होती. त्यानुसार शाहू चौक ते पोवई नाका मार्गावरील एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटसमोर सापळा रचण्यात आला. संशयिताच्या कारची तपासणी केली असता त्यामध्ये व्हिस्की व बिअरचे एकूण 27 बॉक्स आढळून आले. दारूसह वाहन असा एकूण 4 लाख 49 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखील पिंगळे व अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सचिन म्हेत्रे, सपोनि अविनाश माने, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलिस हवालदार निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, प्रवीण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, संतोष घाडगे, सुशांत कदम, सचिन रिटे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT