accident File Photo
सातारा

Satara Accident : बाळूपाटलाचीवाडी येथे अपघातात पती ठार, पत्‍नी गंभीर

नीरा-लोणंद मार्गावरील बाळूपाटलाचीवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील रेल्वे पुलावर ईकोची दुचाकीला धडक

पुढारी वृत्तसेवा

लोणंद : नीरा-लोणंद मार्गावरील बाळूपाटलाचीवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील रेल्वे पुलावर ईकोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात संतोष भरत धोत्रे (वय २७, रा. लोणंद) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी नेहा संतोष धोत्रे (२३) गंभीर जखमी झाल्या. हा अपघात शुक्रवारी रात्री ९.३० च्‍या सुमारास घडला.

संतोष धोत्रे व त्यांची पत्नी नेहा हे दोघे आपल्या दुचाकीवरून नीरा येथून लोणंदच्या दिशेने येत होते. त्यावेळी बाळूपाटलाचीवाडी गावच्या हद्दीतील रेल्वे पुलावर समोरून येणाऱ्या गुजरात पासिंगच्या ईको गाडीने (जीजे ५ आरक्यू २०९४) त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

यानंतर स्‍थानिकांनी घटनास्‍थळी धाव घेतली. स्‍थानिकांनी पती-पत्‍नी दोघांनाही रुग्‍णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्‍यान संतोष यांचे निधन झाले. यानंतर नागरिकांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा केल्‍यानंतर चालकावर गुन्‍हा दाखल केला. याप्रकरणी आकाश अण्णा धोत्रे (२६, रा. लोणंद) यांच्‍या फिर्यादीवरून ईको चालक मिनेश विजय वाघ (४०, रा. लिंबायत, गुजरात) याच्‍यावर लोणंद पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT