घोडेसफारी, घोडागाडीची पर्यटकांना भुरळ Pudhari Photo
सातारा

Panchgani Tourism | घोडेसफारी, घोडागाडीची पर्यटकांना भुरळ

टेबल लँड पर्यटकांनी बहरले : विविध पॉईंटस्वरही गर्दी

पुढारी वृत्तसेवा

पाचगणी : मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाचगणीत मे महिन्याच्या सुट्टीच्या निमित्त पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पाचगणीकरही पर्यटकांच्या स्वागतासाठी तयार झाले आहे. देशभरातून पर्यटक दाखल होत आहे. शहरातील टेबल लँड पठारावर पर्यटक घोडागाडी आणि घोडा सफारीचा आनंद लुटत आहेत. सलग सुट्ट्यांमुळे शहर पर्यटकांनी फुलणार आहे.

अल्हाददायक वातावरणात पाचगणी पर्यटनाची मजा लुटण्यासाठी देशभरातून पर्यटक गर्दी करू लागले आहे. येथील टेबल लँड परिसराला फेरफटका मारण्यासाठी घोडेसवारी आणि घोडागाडी उपलब्ध आहे. इथे फिरण्याचा आनंद घेण्यासाठी सज्ज घोडा गाडी, घोडेसफारीला पर्यटक प्राधान्य देत आहेत. घोडागडीत बसल्यावर घोडेस्वाराकडून पर्यटकांना पाचगणी आणि पठाराविषयी माहिती दिली जात आहे.

टेबल लँडच्या पठारामध्ये दोन गुहा आहेत. तसेच जंगल आणि सह्याद्री पर्वतरांगांची द़ृष्ये पहायला मिळते. या गुहांमध्ये आल्यावर निसर्गाचा अद्भुत कलेचे दर्शन होते. पाचगणीमधील पारसी पॉईंट, सिडनी पॉइंट, टेबल लँड आदी परिसर पर्यटकांनी गजबजून गेला आहे. पर्यटकांच्या गर्दीने फुललेल्या पांचगणी च्या बाजारपेठासह प्रेक्षणीय पॉईंट्स पर्यटकांनी गजबजले आहेत.

वातावरणात बदल झाल्याने पाऊस चालू राहिल्याने निसर्ग सौंदर्य आजही पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरण फिल देत आहे. टेबल लँड सोभावतालचा परिसर निसर्ग सौंदर्याने अधिकच खुलून गेला आहे. त्यातच टेबल लँड वरून दिसणारे धोम धरण तसेच महू धरण जलशय याचे विहंगमय दृश्य पर्यटकांना भुरळ घालत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT