पाटण : पुढारी वृत्तसेवा
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. धरणात सध्या ६४.५६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. (Satara Rain)
आज (मंगळवार) दि. 23 जुलै 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून 1050 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Satara Rain)