भुरकवडी येथील आरोग्य उपकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ना. जयकुमार गोरे व मान्यवर. Pudhari Photo
सातारा

Jaykumar Gore | आरोग्य उपकेंद्रे कायम सुरू राहिली पाहिजेत : ना. जयकुमार गोरे

लोकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात

पुढारी वृत्तसेवा

वडूज : उपकेंद्रे नुसती बांधून चालणार नाहीत तर ही सर्व उपकेंद्र सातत्याने चालू राहिली पाहिजेत. या ठिकणी असणार्‍या आरोग्य विषयीच्या सुविधा लोकांना मिळाल्या पाहिजेत, असे मत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

भुरकवडी, ता. खटाव येथील आरोग्य उपकेंद्राच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ना. गोरे बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, अंकुश गोरे, बी.डी.ओ. योगेश कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. युनुस शेख, डॉ. पराग रणदिवे, भाजपा खटाव तालुकाध्यक्ष अनिल माळी, कक्ष अधिकारी प्रविण लावंड, डॉ. विवेक देशमुख, भरत जाधव, सोमनाथ भोसले, विशाल बागल, अक्षय थोरवे, संजयशेठ शितोळे, गणेश गोडसे, सुधीर गोडसे, सरपंच रेश्मा कदम, उपसरपंच शितल कदम उपस्थित होते.

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, तालुक्यात मंजुर झालेली उपकेंद्रे नुसती बांधून चालणार नाहीत तर ही सर्व उपकेंद्र सातत्याने चालू राहिली पाहिजेत. या ठिकणी असणार्‍या आरोग्य विषयीच्या सुविधा लोकांना मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक उपकेंद्रात स्टाफ असणे गरजेचे आहे. नॅशनल हेल्थच्या माध्यमातून मिळणार्‍या सुविधा देखील या उपकेंद्रातून मिळणार असून तालुका आरोग्य विभागाने तत्परता दाखवणे गरजेचे असल्याचे ना. जयकुमार गोरे म्हणाले.

डॉ. येळगावकर म्हणाले, मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या मतदार संघातील पाण्याचा प्रश्न सोडवला असून घरकूल योजनेसारख्या अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. येणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जयाभाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू या, असे आवाहन त्यांनी केले.

प्रविण लावंड म्हणाले, मी गावच्या विकासाबाबत सकारात्मक असून गावाने मला सुचवलेल्या कामाचा मी सातत्याने पाठपुरावा करीन. अर्चना बनसोडे यांनी रानमळा रस्ता व येरळा नदीवरील पूलाची मागणी केली. प्रविण कदम, दिलीप गाडे, शामराव कदम, मनोज कदम, अविनाश कदम, राजेंद्र कदम, हणमंत गाढवे यांनी स्वागत केले. प्रास्तविक एस. के. कदम यांनी केले. सूत्रसंचलन शरदराव कदम यांनी केले तर छगन कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमास माजी सरपंच हणमंत बोटे, बाबा फडतरे, सचिन जाधव, कार्तिक सावंत, हरिभाऊ बनसोडे, शिवलिंग बनसोडे, गजानन देशमुख, संतोष भंडारे, संजय जगदाळे, दादा सुर्यवंशी, सचिन सुर्यवंशी, मंगेश शिंदे, शिवाजी राजगे, अक्षय फडतरे, अतुल राऊत आदिंसह ग्रामपंचायत, सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी, तालुका आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, ग्रामस्थ, महिला वर्ग, ओंध गटातील सर्व गावचे कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT