सातारा : सातारा जिल्ह्यात दरोडा, घरफोडी, चेन स्नॅचिंग करून धुडगूस घालणार्या दोघांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) पर्दाफाश केला. संशयितांकडून 52 लाख रुपये किमतीचे तब्बल अर्धा किलो सोने हस्तगत केले असून एकूण 23 गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे. दरम्यान, दोन सोनारांनाही पोलिसांनी सहआरोपी केले असून या चौघांनाही अटक केली आहे. यामुळे सराफ व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सचिन संत्र्या भोसले (रा. फडतरवाडी, ता. सातारा), नदीम धर्मेंद्र काळे (वय 22, रा. तुजारपूर, ता. वाळवा, जि. सांगली) अशी चोरट्यांची, तरआशिष चंदुलाल गांधी (वय 39, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव), संतोष जगन्नाथ घाडगे (वय 48, रा. देगाव, ता. सातारा) अशी सराफांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर परिसरासह जिल्ह्यात घरफोडी, जबरी चोरी, चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्याने एलसीबीचे पोलिस संशयितांचा शोध घेत होते. पोलिसांचा तपास सुरू असतानाच त्यांना अशी माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार सचिन संत्र्या भोसले याने त्याच्या 7 साथीदारांसोबत सातारा जिल्ह्यात दरोडा, चैन स्नॅचिंग, घरफोडी असे अनेक
पोलिसांनी चोरट्यांना पकडल्यानंतर सोने हस्तगत करताना पोलिसांची दमछाक झाली. संशयितांनी सातारा जिल्ह्यातील सराफ दुकानदारांना चोरीचे सोन्याचे दागिने दिले असल्याचे सांगितले. यामुळे पोलिस पथक सराफांकडे तपास करत असताना सराफ सुवर्णकार समितीचे उमेश बन्हाडे (रा. पुणे), प्रथमेश नगरकर (रा. पुणे) व शशिकांत दिक्षित (रा. सातारा) यांनी तपासकामात अडथळा निर्माण केला. त्यांनी गुन्ह्यातील समोर आलेल्या सोनारांची दिशाभूल करून त्यांच्यावर दबाव टाकला. गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत होऊ नयेत म्हणून प्रयत्न केले. चोरीचे सोने घेणार्या सोनारांना अभय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, तरीही पोलिसांनी कौशल्याने तपास करून विविध गुन्ह्यांतील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले.