पालकमंत्री कार्यालयाचे स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ना. शंभूराज देसाई व इतर. Pudhari Photo
सातारा

Shambhuraj Desai | पालकमंत्री कार्यालयामार्फत नागरिकांचे प्रश्न सोडवणार : ना. शंभूराज देसाई

पालकमंत्री कार्यालयात पहिल्यांदा बसण्याचा मान स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिकांना देण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न पालकमंत्री कार्यालयामार्फत सोडवणार असल्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे नुतनीकरण करुन त्या ठिकाणी पालकमंत्री कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनाचा मान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व भारतीय लष्करातील माजी सैनिक यांना दिला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मिल्लाकर्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, पालकमंत्री कार्यालयात बसण्याचा मान पहिल्यांदा स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिकांना देण्यात आला आहे. या कार्यालयात 10 दिवसात अधिकारी, कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी, प्रश्नांची रितसर दखल घेवून सोडवण्यात येतील. नागरिकांच्या काही तक्रारी किंवा प्रश्न असतील तर ते हक्काने मांडा, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT