Gold Silver Rate Pudhari
सातारा

Gold and silver rates: सोने, चांदी दरात घसरण, ग्राहकांना दिलासा

अधिक मास महिन्यात जावईबापूंना लॉटरी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : काही महिन्यांपासून तासातासात गगनाला भिडलेल्या सोन्या-चांदीच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना चांगला दिलासा मिळाला आहे. सोन्याचा भाव तोळ्यामागे तब्बल सहा हजार ३०० रुपयांनी व चांदीचा भाव एक किलोमागे ३४ हजार रुपयांनी उतरला आहे. यामुळे सराफ बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढणार असून अधिक मास महिन्यात जावईबापूंना लॉटरी लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी सोन्याचा प्रति तोळ्याचा दर एक लाख ६२ हजार रुपये या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. मात्र, आता तो घसरुन एक लाख ५५ हजार ७०० रुपयांवर आला आहे. दुसरीकडे, चांदीचा दरही खाली आला आहे. दोन दिवसांपूर्वी दोन लाख ८२ हजार रुपये प्रतिकिलो असणारी चांदी आता दोन लाख ४८ हजार ६०० रुपयांवर आली आहे.

चांदीमध्ये ३४ हजार रुपयांनी घट झाली आहे. या दरकपातीमुळे थंडावलेल्या सोने-चांदीच्या खरेदीला गती मिळणार आहे. दर कमी होताच पुन्हा दर वाढतील म्हणून अनेकांनी सोनाच्या दुकानाकडे आपली पावले वळवली आहेत. तर अधिक मास महिन्यात सासुरवाडीकडून जावई आणि माहेरातून लेकीस दागिने घेत असल्याची परंपरा आणि त्यामुळे दर कमी झाल्याने जावई व लेकीचे हौस पुरी होणार असे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT