Talent search exam Pudhari
सातारा

‌Homi Bhabha Talent Search exam: ‘होमी भाभा टॅलेंट सर्च‌’ नोंदणीसाठी अखेरची संधी

विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद; गुणवत्तेला वाव देण्यासाठी मोफत प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

कराड : भविष्यातील शास्त्रज्ञ, उद्योजक शोधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा टॅलेंट सर्च या परिक्षेसाठी नाव नोंदणी करण्याची उद्या, 15 एप्रिलपर्यत अखेरची संधी उपलब्ध आहे. गणित आणि विज्ञान विषयावर ही परिक्षा होत आहे. इयत्ता 7 वी मधून 8 वी, 8 वी मधून 9 वी आणि 9 वी मधून 10 वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश असून विद्यार्थ्यांसह पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आजवर सातारा आणि सांगली या जिल्ह्यांसह पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली आहे.

दैनिक पुढारी आणि विद्यानगर(सैदापूर, ता. कराड) येथील लिगाडे-पाटील ज्युनिअर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिक्षा आयोजित करण्यात आली आहे. 19 एप्रिलला सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत ही परिक्षा होणार आहे. या परिक्षेस जून 2026 मध्ये इयत्ता आठवी म्हणजेच आत्ता इयत्ता सातवीची परिक्षा देणारे, इयत्ता नववी म्हणजेच इयत्ता आठवीची परिक्षा देणारे आणि इयत्ता दहावीमध्ये जाणारे म्हणजेच इयत्ता नववीची परिक्षा देणारे विद्यार्थी पात्र आहेत.

स्पर्धेत यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण तीन लाख रुपयांची रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. तिन्ही वर्गांसाठी प्रत्येकी 1 लाखांचे बक्षिस आहे. तिन्ही वर्गाच्या परिक्षेत प्रथम क्रंमाक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 51 हजार रूपये, द्वितीय क्रंमाक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 31 हजार रूपये आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 11 हजारांचे रोख बक्षिस दिले जाणार आहे.

त्याचबरोबर तिन्ही वर्गात चौथा ते दहावा क्रंमाक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार एक रूपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. कराड तालुक्यातील विद्यानगर (सैदापूर) येथील कराड - विटा मार्गालगत जे. के. पेट्रोल पंपामागे असणाऱ्या लिगाडे - पाटील कॉलेजच्या इमारतीमध्ये ही परिक्षा होणार असून विद्यार्थ्यांसोबत पालकांनी उपस्थित असणे बंधनकारक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT