सातारा

पाटण नगरपंचायतीच्या कचरा डेपोला आग

backup backup

पाटण; पुढारी वृत्तसेवा : पाटण शहराच्या पश्चिमेला डोंगरात अज्ञात व्यक्तीने लावलेला वणवा पसरत गेल्याने लगत असलेल्या पाटण नगरपंचायतीच्या कचरा डेपोने पेट घेतला. यावेळी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येवू लागले. यावेळी खरेदी विक्री संघाचा अग्निशमन बंब व नगरपंचायतीचे पाण्याच्या टँकरद्वारे आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला.

पाटणसह परिसरात वणवे लावण्याच्या प्रकारात वाढ होत असून बुधवार दि. 30 रोजी दुपारी पाटणच्या पश्चिमेकडील बाजूला डोंगराला अज्ञाताने वणवा लावला. हा वणवा एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरत गेला की आजूबाजूचा सर्व परिसर जळून खाक झाला. लगत असलेल्या पाटण नगरपंचायतीच्या कचरा डेपोला आग लागली.

आगीने मोठे स्वरूप धारण केले. धुराचे लोट येवू लागल्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागला. आगीची माहिती ग्रामस्थांनी नगरपंचायतीस दिल्यानंतर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मंगल कांबळे, उपनगराध्यक्ष सागर पोतदार, नगरसेवक सचिन कुंभार, स्वप्नील माने, राजेंद्र राऊत, जगदीश शेंडे, किशोर गायकवाड, उमेश टोळे, जयदीप फुटाणे, नगरपंचायतीचे अधिकारी अनिरूध्द महाजन, विष्णू चव्हाण आदींसह कर्मचार्‍यांनी व पाटणचे तलाठी जयेश शिरोडे, स्वप्नील नेवरेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी खरेदी विक्री संघाच्या अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले. तोपर्यंत कचरा डेपोच्या आजूबाजूला लागलेली आग विझविण्यात आली.

वनसंपदेचे नुकसान..

आजूबाजूच्या डोंगर परिसरात लागलेली आग सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. आगीत शेकडो एकर क्षेत्रातील गवत जळून खाक झाले.वणव्यामुळे वनसंपदा जळून खाक होत आहे. डोंगरांना लागलेल्या वणव्यामुळे संपूर्ण डोंगरातील वाळके गवत असणारा जनावरांचा चारा जळून गेल्याने उन्हाळ्यात चार्‍याचा प्रश्न गंभीर होणार आहे. विविध प्रकारच्या वनसंपत्तीची हानी झाली होत असून लहान-मोठे कीटक, जीवजंतू, पक्षांची घरटीही जळून खाक होत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT