सातारा : मृत व्यक्तीचे बनावट मृत्युपत्र तयार करुन ते मृत्युपत्र साताऱ्यातील नगर भूमापन कार्यालय येथे दाखल केल्याप्रकरणी चौघांवर फसवणुकीचा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फहाद नजीर खान (रा.सदर बझार), सिध्देश्वर करवैय्या स्वामी (रा. शनिवार पेठ), प्रताप धंनजय शिंगटे (रा. देशमुख कॉलनी), ॲड. घनशाम महादेव फरांदे (रा.तामजाईनगर सर्व सातारा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अमीन बद्दुद्दीन आगा (वय 65, रा. फलटण) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 27 ऑगस्ट 2014 अगोदर घडली आहे.
अमीन आगा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयितांनी तक्रारदार यांचे मामा कदीर आयुब खान यांच्या सदरबझार, सातारा येथील काही प्लॉटची मालमत्ता घेण्यासाठी बेकायदेशीरपणे फसवणूक केली. मामा कादीर खान यांचा 19 जानेवारी 2014 साली मृत्यू झाला असताना त्यांचे 27 ऑगस्ट 2014 साली बनावट मृत्युपत्र तयार केले. ते मृत्युपत्र खरे असल्याचे भासवून भूमापन कार्यालय, सातारा येथे सादर केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.