वाईच्‍या सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये मुदतबाह्य औषधे  
सातारा

Satara News : वाईच्‍या सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये मुदतबाह्य औषधे

रुग्णाच्या नातेवाईकाची 'अन्‍न-औषध'कडे तक्रार

पुढारी वृत्तसेवा

वाई : वाई येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये रुग्णाला मुदतबाह्य औषध दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मे २०२६ मध्‍ये मुदत संपलेली गोळी रुग्‍णाला दिली होती. तसेच या पॅकवरील तारीखही पुसल्‍याच आरोप बावधन (ता. वाई) येथील कार्तिक हणमंत बागल यांनी करत अन्‍न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या प्रकारामुळे वाई शहरात खळबळ उडाली आहे.

कार्तिक बागल यांच्‍या पत्‍नी सेजल बागल यांना १ ऑगस्ट रोजी दुपारी उपचारासाठी सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांना ‘Adivit Total’ नावाची गोळी देण्यात आली. संबंधित औषधाची मुदत मे २०२६ मध्येच संपलेली होती. याचबरोबर ती गोळी घेण्‍यासाठी सेजल यांना देण्‍यात येत असताना या गोळीवर बुरशी लागल्‍याचेही दिसून आले. यानंतर कार्तिक यांनी याचा जाब रुग्‍णालय प्रशासनाला विचारला.

याप्रकरणी कार्तिक बागल यांनी अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागाच्या सहायक आयुक्तांकडे तक्रार दाखल करून संबंधित औषधाची तपासणी करण्याबरोबरच रुग्णालयातील औषध साठा, खरेदी, पुरवठा आणि वितरण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत रुग्णालय प्रशासनाने संबंधित गोळ्या नजरचुकीने देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर रुग्णाकडून गोळ्या परत घेण्यात आल्या असून, डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांची माफीही मागितल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. आता अन्न व औषध प्रशासनाकडून या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष तपासणी केली जाते का आणि औषधाची मुदत, साठा व वितरण प्रक्रियेबाबत नेमके काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT