सातारा : पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथींची वाढ कर्करोगाला आमंत्रण देत आहे. पुरुषांमध्ये होणार्या कर्करोगांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण 3 टक्के आहे. प्राथमिक लक्षणे व आजाराबाबत जागरुकतेच्या अभावामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. 45 वर्षांवरील पुरुषांनी नियमित पीएसए चाचणी करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
पुरुषांचे वाढते वय, वृद्धत्वामुळे, प्रोस्टेटमधील पेशींची वाढ आणि विभाजन कमी होत नसल्यामुळे कर्करोगाच्या पेशी तयार होण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रोस्टेट ग्रंथी ही पुरुष प्रजनन प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग असला तरी प्रोस्टेटची वाढ ही कर्करोगाला आमंत्रण देत आहे. राष्ट्रीय आरोग्य सर्वेनुसार काळी वर्षांपूर्वी भारत प्रोस्टेट कॅन्सर रुग्णांमध्ये 11 व्या क्रमांकावर होता. मात्र सध्या भारत तिसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. प्रोस्टेट कर्करोगाची प्राथमिक लक्षणे व आजाराबाबत जागरुकतेचा अभाव असल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आजारपण टाळण्यासाठी शक्य तेवढी काळजी घेणे गरेजचे आहे.
विशेषत: 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांनी, नियमित पीएसए चाचणी करणे आवश्यक आहे. तसेच चहा, कॉफी व मद्यसेवन टाळणे, ज्यांना जोखीम आहे त्यांनी रात्री आठनंतर पाणी पिणे टाळावे. दिवसभर लघवी न रोखणे, नियमित व्यायाम करणे, बुद्धकोष्ठतेची समस्या होणार नाही याची खबरदारी घ्यावी. चिंता व तणावरहित जीवन शैली अंगीकारावी.
प्रोस्टेट कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, परंतु नियमित तपासणी आवश्यक आहे. जर त्याच्या कुटुंबात आधीच प्रोस्टेट कर्करोगाचा रुग्ण असेल तर त्याने ही चाचणी वयाच्या 40 व्या वर्षांपासून सुरुकरावी.-डॉ. अमोल पवार, रेडिएशन ऑन्कोलॅाजिस्टस