सातारा

Atulbaba Bhosale : पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. स्मिता जाधव सक्षम

आमदार अतुलबाबा भोसले; आमदारांची उमेदवारांच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी

पुढारी वृत्तसेवा

कराडः पदवीधर युवकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याची क्षमता, उच्च शिक्षणाचा अनुभव आणि सामाजिक कार्याची भक्कम पार्श्वभूमी असलेल्या डॉ. स्मिता योगेश जाधव या विधानपरिषदेत पदवीधरांचा आवाज सक्षमपणे मांडतील, असा विश्वास भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ मलकापूर व कराड शहरात आयोजित मतदार संवाद बैठकांमध्ये ते बोलत होते. कराडचे माजी नगरसेवक अतुल शिंदे, विरोधी गटनेते विजय वाटेगावकर, नगरसेविका किशोरी शिंदे, नगरसेवक सुमित जाधव, नगरसेवक शिवाजी पवार, नगरसेवक अशुतोष डुबल, स्मिता हुलवान, राजेंद्र डुबल, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, माजी नगरसेवक राजेंद्र यादव, प्रमोद शिंदे, धनंजय येडगे, सुनील खैरे, शहाजी पाटील, अक्षय शिंगाडे, प्रशांत चांदे, दिनेश रैनाक, सतीश चांदे, सुरज शेवाळे, बाळासाहेब सातपुते, अभिजीत शिंदे, विजय पवार, हणमंतराव पवार, सुहास कदम, शरद पवार, नंदकुमार साठे, राहुल पोळ, सचिन वास्के, दिलीप जाधव, प्रशांत कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, विशाल साळुंखे, किरण मुळे यांच्यासह आजी - माजी पदाधिकारी, कराड व मलकापूरमधील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही शहरांत प्रत्येकी चार बैठकांचे आयोजन करण्यात आले. मलकापूर येथे गजानन नागरी पतसंस्था हॉल, नगराध्यक्ष तेजस सोनावले यांचे निवासस्थान, श्री. शेवाळे यांचे अपार्टमेंट, दत्त मंदिर हॉल आणि गणेश कॉलनी येथे बैठका झाल्या. कराडमध्ये प्रभाग क्रमांक १४ व १५ मधील मतदारांची स्वामी समर्थ केंद्र, कार्वे नाका येथे, प्रभाग १२ व १३ मधील मतदारांची स्पंदन हॉस्पिटलजवळ, प्रभाग ८ व १० मधील मतदारांची सारडा लॉन परिसर येथे, तर प्रभाग २ व ४ मधील मतदारांची रुक्मिणी गार्डन येथे बैठक झाली.

भाजप नेते प्रशांत यादव म्हणाले, केंद्र सरकारसह राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यासह पश्चिम महाराष्ट्राचा कायापालट होत आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांच्या माध्यमातून आपणास केवळ उच्च शिक्षित उमेदवारच नव्हे तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे, सामान्यांच्या व्यथा सोडविणारे उमेदवार मिळाले आहेत. त्यांच्या पाठिशी ताकद उभी करावी असे सांगत डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांचा विजय निश्चित असल्याचे प्रशांत यादव यांनी यावेळी सांगितले.

डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, डॉ. स्मिता जाधव या उच्चशिक्षित असून महिला आणि युवकांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. जाधव कुटुंबाचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान दीपस्तंभासारखे आहे. पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या सक्षमपणे विधानपरिषदेत आवाज उठवतील. त्यामुळे त्यांना विजयी करणे आवश्यक आहे. यावेळी कराडचे माजी नगरसेवक अतुल शिंदे यांनी दोन्ही उमेदवारांच्या कार्याची माहिती देत पदवीधर व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी त्यांना पाठबळ देण्याचे आवाहन केले. विरोधी गटनेते विजय वाटेगावकर यांनी विकासकामांना अधिक बळ देण्यासाठी दोन्ही उमेदवारांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन केले.

बैठकीस रत्नागिरीचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, नगरसेविका किशोरी शिंदे, किरण मुळे, शिवाजी पवार, सुमित जाधव, राजेंद्र डुबल, आशुतोष डुबल, संदीप दादा यांच्यासह पदाधिकारी व मतदार उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिकेत उर्फ गुलाब पाटील वहागावकर यांनी केले, तर आभार विजय वाटेगावकर यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT