crime news Pudhari
सातारा

Mayani Doctor robbed: कोयत्याचा धाक दाखवून मायणीतील डॉक्टरला लुटले

चितळी, ता. खटाव येथे कोयत्याचा धाक दाखवून डॉक्टरची सव्वा लाखाची लूट केल्याची घटना घडली

पुढारी वृत्तसेवा

कलेढोण : चितळी, ता. खटाव येथे कोयत्याचा धाक दाखवून डॉक्टरची सव्वा लाखाची लूट केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

डॉ. जोतिराम ज्ञानदेव पवार (वय 41, रा. मूळ रा. चितळी, सध्या रा. भारत माता विद्यालयासमोर, मायणी, ता. खटाव ) यांनी फिर्याद दिली आहे. दि. 10 जानेवारी रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास चितळी, ता. खटाव हद्दीत माहुलीचा ओढा नामक शिवारातील डॉ. पवार यांच्या शेताच्या पाणंद रस्त्यावर ही घटना घडली. डॉ. पवार तेथून जात असताना दोन अनोळखी तेथे आले व त्यांनी गाडीची काच खाली घेण्यास सांगितले. त्यानंतर डॉ. पवार यांना कोयत्याचा धाक दाखवून पवार यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील अंगठ्या असा 1 लाख 23 हजार रुपये किंमतीचे दागिने हिसकावून चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी उपअधीक्षक रणजित सावंत यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT