दहिवडी : दहिवडी व परिसरात झालेल्या नऊ चोर्या उघडकीस आणून दहा संशयितांना अटक करण्यात दहिवडी पोलिसांना यश आले आहे. सर्व संशयितांकडून मिळून साडेबारा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
प्रविण बापुराव चव्हाण, प्रशांत बापुराव चव्हाण, विकास तानाजी चव्हाण, सुमीत रामचंद्र पाटोळे, अनिल नंदकुमार दळवी, मुकेश आबा अवघडे, सौरभ संतोष अवघडे, गौरख संजय चव्हाण, अजय आनंदा चव्हाण व एक विधीसंघर्ष बालक (सर्व राहणार दहिवडी, ता. माण) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिवडी पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या विहिरीवरील व बोरवेलवरील मोटार चोरी, केबल चोरी तसेच शासकीय धान्य गोडावूनमधून चोरीस गेलेला तांदुळ व जिल्हा परिषद शाळेतील तांदुळ व गॅस टाकी, दहिवडी येथील सिध्दनाथ मंदिरा जवळील तालमीतील व्यायामाचे साहित्य या चोर्यांचा समावेश होता. या चोर्या सहा महिन्यापूर्वी झाल्या आहेत. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय दराडे व दहिवडी पोलिसांच्या पथकाने तपासाची चक्रे गतीने फिरवली. या चोर्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून दहा संशयितांना अटक केली.
पोलिसांनी सुमारे साडेबारा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे साहित्य चोरी मधील सर्व आरोपीं दहिवडीतील आहेत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय दराडे, महिला पोलिस उपनिरीक्षक चांदणी मोटे, स्वाती धोंगडे, पोलिस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश खाडे, पोलिस हवालदार बापू खांडेकर, तानाजी काळेल, विजय खाडे, रामचंद्र गाढवे, नितीन धुमाळ, अजिनाथ नरबट, निलेश कुदळे, महेंद्र खाडे, गणेश खाडे यांनी केली.